लोहोणेर येथे आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:10 IST2018-03-11T00:10:18+5:302018-03-11T00:10:18+5:30
लोहोणेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या खेलो भारत योजनेअंतर्गत व स्थानिक तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून लोहोणेर येथे मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत.

लोहोणेर येथे आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन
लोहोणेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या खेलो भारत योजनेअंतर्गत व स्थानिक तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून लोहोणेर येथे मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. याचा परिसरातील तरु णांना फायदा मिळेल व खेळासाठी प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन आमदार राहुल आहेर यांनी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी सरपंच जयवंता बच्छाव होत्या, तर जिल्हा बँकेचे चेअरमन केदा अहेर, पंकज निकम, कल्पना देशमुख, सतीश देशमुख, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, चांदवड तहसीलदार शरद मंडलिक, देवळा नगरपालिका मुख्याधिकारी एस. के. भोये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, दीपक बच्छाव, सुधाकर पगार, गोविंद कोठावदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या आमदार चषक मर्यादित षटकांच्या साखळी सामन्यात एकूण बत्तीस संघ सहभागी झाले आहेत. यासाठी प्रवीण अलई, बलराज थेट, संतोष पाटील, प्रमोद हिरे, सुनील महाले, नीलेश दळवी हे विशेष परिश्रम घेत आहेत. यावेळी अशोक अलई, दिनकर देवरे, अतुल पवार, निंबा धामणे रमेश आहिरे, महेंद्र परदेशी राकेश गुळेचा, योगेश सोनवणे, सोपान सोनवणे, जाकीर शेख, गणेश अलई, समाधान महाजन, योगेश पवार आदी उपस्थित होते.