मालेगावी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST2021-06-20T04:10:57+5:302021-06-20T04:10:57+5:30

सावित्रीबाई फुले महिला बचतगटामार्फत येथील सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन मंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी भुसे ...

Inauguration of Malegaon Shivbhojan Kendra | मालेगावी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

मालेगावी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

सावित्रीबाई फुले महिला बचतगटामार्फत येथील सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन मंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी भुसे बोलत होते. यावेळी ॲड. रवींद्र पगार, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, रामा मिस्तरी, संदीप पवार, विजय पवार, धनंजय पाटील, सलीम रिझवी, पुरवठा निरीक्षक सचिन शिंदे, बचतगटाच्या अध्यक्षा गीताबाई तायडे, हेमलता मानकर, संगीता पवार, मयूर वांद्रे, मोसीन शेख, किशोर इंगळे आदी उपस्थित होते. आहाराची गुणवत्ता राखण्याबरोबर एकही गरजू यापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व केंद्रप्रमुखांनी दक्ष राहण्याच्या सूचनाही मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

फोटो- १८ शिवभोजन

मालेगावी सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करताना कृषीमंत्री दादा भुसे. समवेत रवींद्र पगार, रामा मिस्तरी, संदीप पवार आदी.

===Photopath===

180621\342518nsk_40_18062021_13.jpg

===Caption===

फोटो- १८ शिवभोजन मालेगावी सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्रांचे उदघाटन करतांना कृषिमंत्री दादा भुसे समवेत रवींद्र पगार,रामा मिस्तरी,संदीप पवार आदी

Web Title: Inauguration of Malegaon Shivbhojan Kendra