मालेगावी गुलाबपार्क जलकुंभाचे उद्घाटन

By Admin | Updated: June 27, 2014 00:11 IST2014-06-26T21:27:59+5:302014-06-27T00:11:41+5:30

मालेगावी गुलाबपार्क जलकुंभाचे उद्घाटन

Inauguration of the Malegaavi Gulabpark Hydrox | मालेगावी गुलाबपार्क जलकुंभाचे उद्घाटन

मालेगावी गुलाबपार्क जलकुंभाचे उद्घाटन

 

मालेगाव : सर्व्हे नं. ८५, फरान हॉस्पिटलजवळ असलेल्या जलकुंभाचे उद्घाटन महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर जमीलशेठ जरवाले, नगरसेवक नवीद खतीब, धर्मा अण्णा भामरे, नगरपालिकेचे शेख उमर होते.
महापौर शेख म्हणाल्या की, शहरालगत असलेले बतुल पार्क, मास्टर कॉलनी, कुबा मशिद, देवीचा मळा, उमराबाद, अख्तराबाद, फार्मेसी कॉलेज, गुलाब पार्क, जाफरनगर, नवा फारान हॉस्पिटल परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रात्री-बेरात्री पाण्याच्या पुरवठा करण्यात येत होता. मात्र सर्व्हे नं. ८५ येथील जलकुंभ कार्यान्वित झाल्याने सदर परिसरात आता दिवसा योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल.
सर्व्हे नं. १३३ व १३० नवी वस्ती, उस्मान गदी मशिद, काली खोली, मिल्लत मदरसा, फार्मेसीनगर, सलाटर हाऊस येथेही लवकरच जलकुंभ सुरू करण्यात येऊन सदर भागातही दिवसा योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना नवीन नळ कनेक्शन घ्यावयाची आहे. त्यांनी सर्व कागदपत्रांसह प्रभाक क्र. ३ इस्हाक मुंशी टाऊन हॉल येथे संपर्क साधावा. कोणीही बेकायदेशीर नळ कनेक्शन घेऊ नये, ज्यांनी बेकायदेशीर न कनेक्शन घेतले असल्यास त्यांनी महापालिकेत किंवा प्रभाग कार्यालय येथे संपर्क साधून नळ कनेक्शन कायदेशीररीत्या करून घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

Web Title: Inauguration of the Malegaavi Gulabpark Hydrox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.