भालूरला महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन

By Admin | Updated: August 6, 2014 00:46 IST2014-08-05T20:31:03+5:302014-08-06T00:46:10+5:30

भालूरला महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन

Inauguration of Mahal E-Seva Kendra, Bhalur | भालूरला महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन

भालूरला महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन

 

मनमाड : भालूर येथे सुरू करण्यात आलेल्या महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन नायब तहसीलदार राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य साहेबराव पाटील, विनोद सानप, सरपंच वामन पवार, उपसरपंच विलास अहेर, वाहीद शेख उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भालूरसारख्या ग्रामीण भागात महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आल्याने मोठी गैरसोय दूर होऊन कामात पारदर्शकता येणार असल्याचे मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या केंद्रावरून शेतकऱ्यांना सातबारा उतारा, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, डोमीसाइल, नॅशनॅलिटी, रेशनकार्ड यासह अन्य शासकीय कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होणार आहे. या वेळी बाबूराव निकम, विनायक कुलकर्णी, अकबर शहा, प्रकाश अहेर, शब्बीर शेख, सुभान शहा यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जाफर शहा, गफुर शहा यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Inauguration of Mahal E-Seva Kendra, Bhalur