सटाण्यात व्याख्यानमालेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:47 IST2020-02-13T23:11:29+5:302020-02-14T00:47:04+5:30

सटाणा येथील महाविद्यालयात पुणे बहि:शाल मंडळ व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला संपन्न झाली.

Inauguration of a lecture paper in Satta | सटाण्यात व्याख्यानमालेचे उद्घाटन

सटाणा महाविद्यालयात संत गाडगे महाराज ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना प्रमुख वक्ते प्रा. राजाराम मुंगसे. समवेत प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, नेरकर, प्रा. नीलेश पाटील, प्रा. धनंजय पंडित आदी.

सटाणा : येथील महाविद्यालयात पुणे बहि:शाल मंडळ व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला संपन्न झाली. बहि:शाल शिक्षण विभागाच्या डॉ. दीपा कुचेकर यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आलेल्या वक्त्यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, बहि:शाल या शब्दाचा अर्थच शाळाबाहेरील शिक्षण असा आहे. अर्थातच ही ज्ञानाची गंगा समाजापर्यंत घेऊन जाणे अपेक्षित आहे. एकूण सामाजिक विकासासाठी अनौपचारिक शिक्षणाचीसुद्धा गरज असते. ही गरज ओळखून विद्यापीठाने संत गाडगेबाबा नागरिक व्याख्यानमाला सुरू केली. ज्यामध्ये वेगवेगळ्या ज्ञानपैलूंवर प्रकाश टाकला जातो.
पहिले पुष्प प्रा. राजाराम मुंगसे यांनी गुंफले त्यांचा विषय रसास्वाद हा होता. केदुपंत भालेराव यांनी मनोरंजनातून तरुणाई या विषयावर गुंफले. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी समाजात कुटुंबात वावरताना तरुणांशी मनोरंजनातून संवाद साधण्याचे आवाहन केले. यात व्याख्यानमालेत जिभाऊ सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, नेरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी प्रा. नीलेश पाटील, डॉ. दीपा कचेकर, प्रा. धनंजय पंडित, प्रा. लक्ष्मण सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले.








वार्धक्यात मनुष्याजवळ सर्व जीवनानुभव असतात. त्या जीवनानुभवांचा समाजाला, कुटुंबाला उपयोग व्हावा यासाठी तरु णांशी संवाद साधताना जर हसत खेळत सहजपणे संवाद साधला तर तरु णपिढी निश्चितच ज्येष्ठांचे अनुभव ग्रहण करते. शरीराच्या छोट्या-छोट्या दुखण्यांना उगाच कुरवाळत बसू नये. शक्यतो आपल्या आर्थिक गरजा स्वत: भागवाव्यात.

तिसरे पुष्प सय्यद इलियास मुनाबभाई यांनी ‘ज्येष्ठ नागरिक एक समर्पित जीवन’ विषयावर गुंफले. ते म्हणाले की, आधुनिक काळात जरी सोयीसुविधा वाढलेल्या आहेत; पण माणसांमधील आपुलकी कमी होत आहे. समाज व कुटुंबासाठी ज्येष्ठांनी समर्पित जीवन जगले पाहिजे. कुटुंबात शांतता कशी टिकून राहील याकडे ज्येष्ठांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. यावेळी सय्यद यांनी आयुर्वेदिक हर्बल उत्पादनांचीदेखील माहिती दिली.

Web Title: Inauguration of a lecture paper in Satta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.