लासलगाव : येथील श्री श्रमणसंघीय स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जैन स्थानकाचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक ६ आॅगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.लासलगाव शहरातील जैन स्थानक उद्घाटन व सौभाग्यमलजी मसा यांचा चौतिसावा पुण्यस्मरण दिवस अशा दोन कार्यक्र मानिमित्त शहरांमध्ये विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.श्रद्धेय गुरु देव प्रकाश मुनीजी म.सा. व दर्शनमुनिजी म सा ठाणा २ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात चातुर्मास सुरू असून या संतांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.नवीन बांधण्यात आलेल्या जैन स्थानकाचे उद्घाटन जैन श्रवणीय संघाचे संघपती रतनलाल राका यांच्या हस्ते उद्योजक सुखराज सांड यांच्या अध्यक्षतेखशली होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मोहनलाल चोपडा, प्रेमचंद कोटेचा, सोहनलाल भंडारी, हिरालाल साबद्रा, संपतलाल सुराणा, शशिकांत कर्नावट, जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, कल्याणराव पाटील, नानासाहेब पाटील, माणकलाल बागरेचा, अमोलकचंद पारख, रखबचंद जैन, मनोज जैन, अनिल चोरिडया, चंद्रप्रकाश मुनोत, हनुमान प्रसाद जैन, महेंद्र जैन, मोहनलाल संचेती, शांतीलाल चोरिडया, अमतिकुमार संकलेचा, ललीत मोदी, चंद्रकांत पारख, जीवनकुमार बोकडीया, श्रेणीक लुणावत, भिकचंद मुथा, नंदकुमार चोरिडया, जव्हेरीलाल भंडारी, सुरेशचंद्र भटेवरा, पुनमचंद लुनावत आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे श्री श्रमणसंघीय स्थानकवासी जैन श्रावक संघ व जैन ओसवाल पंच यांच्यातर्फे सांगण्यात आले.
लासलगाव जैन स्थानकाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:17 IST
लासलगाव : येथील श्री श्रमणसंघीय स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जैन स्थानकाचा उद्घाटन सोहळा आज सोमवार दिनांक ६ आॅगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
लासलगाव जैन स्थानकाचे उद्घाटन
ठळक मुद्देशहरांमध्ये विविध कार्यक्र माचे आयोजन