प्रभाग ३७ मध्ये ग्रीन जीमचे उद्घाटन

By Admin | Updated: March 30, 2016 22:37 IST2016-03-30T22:37:02+5:302016-03-30T22:37:26+5:30

प्रभाग ३७ मध्ये ग्रीन जीमचे उद्घाटन

Inauguration of Green Guy in Ward 37 | प्रभाग ३७ मध्ये ग्रीन जीमचे उद्घाटन

प्रभाग ३७ मध्ये ग्रीन जीमचे उद्घाटन

उपनगर : प्रभाग ३७ मध्ये पाच सार्वजनिक ठिकाणी ग्रीन जीमचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी फरांदे म्हणाल्या की, आरोग्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असल्याने ग्रीन जीम उभारण्यात येत आहे. उपनगर प्रभाग ३७चे नगरसेवक कुणाल वाघ यांनी पुढाकार घेऊन आमदार फरांदे यांच्या निधीतून गांधीनगर, संजय गांधीनगर, अयोध्यानगर, मातोश्रीनगर व इच्छामणी जॉगिंग ट्रॅक परिसरात ग्रीन जीम साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
रविवारी पाचही ग्रीन जीमचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, तानाजी सहाणे, कैलास वैशंपायन, श्यामराव जाधव, विनायक काटे, प्रशांत नाईक, प्रकाश सोमवंशी, श्याम पाटील, विजय सोमवंशी, प्रकाश बोधवानी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Inauguration of Green Guy in Ward 37

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.