मरळगोई शाळेत ‘ई-लर्निंग’चे उद्घाटन
By Admin | Updated: April 20, 2015 23:57 IST2015-04-20T23:56:32+5:302015-04-20T23:57:33+5:30
मरळगोई शाळेत ‘ई-लर्निंग’चे उद्घाटन

मरळगोई शाळेत ‘ई-लर्निंग’चे उद्घाटन
विंचूर : निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता हायटेक शिक्षण मिळणार आहे. पालक व शिक्षकांच्या आर्थिक सहभागातून चिमुकल्यांसाठी ई-लर्निंग प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती सौ. किरण थोरे यांच्या हस्ते ई-लर्निंग प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे शाळेत नवीन तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग होणार आहे. अध्ययन क्रिया अधिक सुलभपणे, परिणामकारक व प्रभावी होण्यासाठी प्रणालीचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायद होईल, अशी अपेक्षा थोरे यांनी यावेळी व्यक्त केली. सदर प्रणालीचा शाळेतील सुमारे १६० विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
शाळेत सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सह्याने अभ्यासक्र म शिकता येणार असल्याचे सांगून शिक्षकांच्या उपक्रमशिलतेचे केंद्रप्रमुख ढगे यांनी कौतुक
केले.
यावेळी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अनिल बोडके यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच गणेश फापाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब थोरे, उपाध्यक्ष अजय बनसोडे, केंद्रप्रमुख ढगे यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.