कृषिविभागातफे चर्चा सत्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:57 IST2020-02-25T14:56:55+5:302020-02-25T14:57:38+5:30

नांदगाव: कृषी विभागातर्फे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्र माच्या चार दिवशीय चर्चा सत्राचेयेथे आमदार सुहास कांदेयांच्याहस्तेउद्घाटनझाले.याप्रसंगी अनुसूचित जाती-जमाती तसेच अल्पभूधारक शेतकº्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

 Inauguration of a discussion session by the Department of Agriculture | कृषिविभागातफे चर्चा सत्राचे उद्घाटन

  ट्रॅक्टर वितरण प्रसंगी आमदार सुहास कांदे, दिलीप देवरे, जगदीश पाटील व लाभार्थी. 

ठळक मुद्दे  नवीन तंत्रज्ञान व शासनाच्या नविन योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवून त्यांचा भविष्यकाळ अधिक समृध्द करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच एकाच पिकाच्या मागे धाव घेण्यापेक्षा विविध पिकांचे उत्पन्न घ्यावे असे प्रतिपादन आमदार सुहास

 



जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पं.स.उपसभापती सुशिला नाईकवाडे, माजी सभापती विद्या पाटील, माजी उपसभापती सुभाष कुटे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे,ग.वि.अ. गणेश चौधरी, कृषी अधिकारी जगदीश पाटील, नगरसेवक किरण देवरे, क्रि स्टल कंपनीचे अशोक पालवे, बाळासाहेब कवडे, संतोष गुप्ता आदी उपस्थित होते.
कांदे पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवाला शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. औषध कंपन्याविषयी बोलतांना ते म्हणाले तेल्या रोग असो की, लष्करी आळी याविषयी जागरूक करण्याऐवजी भीती पसरवून औषधांचा खप वाढवला जातो. रासायनिक कंपन्यांचे हे षडयंत्र आहे. सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे.असेहीतेम्हणाले.
पारंपारिक शेतीमध्ये वेगळ्या मार्गाने शेती करणार्या देविदास मार्कड-भार्डी (अद्रक), सुनील पांडव-मूळडोंगरी (ढोबळी मिरची),यांच्यासह गटशेती करून मिरची थेट युरोप खंडात निर्यात करणाऱ्या भालुर येथील परशराम शिंदे, विठोबा आहेर यांच्यासह दहा शेतकऱ्यांचा गौरव यावेळी आमदार कांदे यांचे हस्ते करण्यात आला.
रमेश बोरसे, सुभाष कुटे यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी तालुक्यात ठिबक सिंचन मध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांनी बोलताना फळपीक विमा योजनेअंतर्गत सुमारे ३२लाख रु पये मंजूर झाले आहेत. तसेच शेततळे अस्तरीकरणासाठी नाशिक जिल्ह्याला १४कोटी रु पये मंजूर झाले आहेत, त्यात मालेगाव,सटाणा व नांदगाव तालुक्याला सुमारे १० कोटी रु पये मंजूर असल्याची माहिती यावेळी दिली.
 

 

Web Title:  Inauguration of a discussion session by the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.