लासलगाव : जिल्हा परिषदशाळा थेटाळे येथे डिजिटल क्लासरूमचे बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी व्यासपीठावर सरपंच रंजना माळी, शिक्षणाधिकारी गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष स्मिता कुलकर्णी, भाजप जिल्हा सरचिटणीस ज्योती शिंदे, रूपा केदारे, सुजाता शिंदे, प्रा. निकाळजे, माजी केंद्रप्रमुख ठाकरे, कापडणीस, ग्रुप ग्रामपंचायत चेअरमन सतीश शिंदे, माजी सरपंच दगू शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र शिंदे, कल्याणी निकम, सुजाता शिंदे, संतोष शिंदे उपस्थित होते.दप्तरमुक्त शाळांबाबत सुवर्णा जगताप यांनी कौतुक करून शालेय शिक्षण पद्धतीवर भाष्य करीत भविष्यात लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.जिल्हा परिषद शाळेत दोन वर्ग असून, वाढीव दोन वर्गासाठी निधी देण्याचे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी सांगितले आहे. यावेळी परिसरातील शेतकरी वर्गाशी चर्चा करण्यात आली. यावेळी खैरे, वळवी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. (२१ लासलगाव)
थेटाळे येथे डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:17 IST
लासलगाव : जिल्हा परिषद शाळा थेटाळे येथे डिजिटल क्लासरूमचे बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्या हस्ते पार पडले.
थेटाळे येथे डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन
ठळक मुद्दे भविष्यात लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.