शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लेखा व कोषागार कर्मचाऱ्यांच्या विभागीय स्पर्धांंचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 15:52 IST

लेखा व कोषागारे विभागात काम करताना शरीर व मन सदृढ असणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून खेळामुळे दैनंदिन कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते. यास्पर्धांच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आल्याने कार्यसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन तापी खोरे विकास महामंडळाचे वित्त संचालक बाळासाहेब घोरपडे यांनी केले. 

ठळक मुद्देलेखा व कोषागारे कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात नाशिकच्या धावपटूंची विभागीय स्पर्धांमध्ये चमक

 नाशिक : लेखा व कोषागारे विभागात काम करताना शरीर व मन सदृढ असणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून खेळामुळे दैनंदिन कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते. यास्पर्धांच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आल्याने कार्यसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन तापी खोरे विकास महामंडळाचे वित्त संचालक बाळासाहेब घोरपडे यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या क्रीडांगणावर लेखा व कोषागारे संचालनालयाच्या कर्मचारी कल्याण समितीच्या माध्यमातून नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बाळासाहेब घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संचालक जितेंद्र इंगळे, वित्त व लेखा विभागाचे सहसंचालक राजेश लांडे, नाशिक विभागाचे सहसंचालक निलेश राजूरकर, गिरीश देशमुख, मनपाचे मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव, मुख्य लेखा अधिकारी सुहास शिंदे, आदिवासी विकास महामंडळाचे वित्त महाव्यवस्थापक उत्तम कावडे, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी विकास गांगुर्डे आदी उपस्थित होते. दोन दिवस चालणाºया या स्पर्धांमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडुंनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल यासह विविध मैदानी क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहसंचालक गिरीश देशमुख यांनी दिली. नाशिकच्या धावपटुंचा झेंडा लेखा व कोषागारे संचालनालयाच्या कर्मचारी कल्याण समितीच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी त्यांचा झेंडा रोवला. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात रंजन देशमुख  व महिला गटात प्रमिला जाधव  या नाशिकच्या स्पर्धकांनी विजय मिळविला. तर दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेतही नाशिकच्या दिपक बर्गे आणि बबिता गिरी यांनी विजेतेपद पटकावला. 

टॅग्स :Employeeकर्मचारीNashikनाशिकBadmintonBadmintonuniversityविद्यापीठ