स्वच्छता अभियानाची सुरुवात घराच्या गोठ्यापासून करा केदा अहेर यांचे आवाहन
By Admin | Updated: November 16, 2014 00:48 IST2014-11-16T00:48:16+5:302014-11-16T00:48:42+5:30
स्वच्छता अभियानाची सुरुवात घराच्या गोठ्यापासून करा केदा अहेर यांचे आवाहन

स्वच्छता अभियानाची सुरुवात घराच्या गोठ्यापासून करा केदा अहेर यांचे आवाहन
नाशिक : जिल्'ात शाळा, अंगणवाड्या व दवाखान्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत असले तरी ग्रामीण भागात खरी स्वच्छतेची गरज घराशेजारील जनावरांची व गोठ्यांची स्वच्छता राबविण्याची आहे. त्यामुळे सर्वांनी घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी, यासाठी पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे,अशी सूचना कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे. यासंदर्भात पत्रकात केदा अहेर यांनी म्हटले आहे की, भारत सरकारने २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण भारत देशात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, नाशिक जिल्हा परिषदेनेही सदर अभियानात सहभाग घेतलेला आहे. या स्वच्छता अभियानामध्ये सरकारी कार्यालये, गावातील रस्ते, शाळा यांचीच स्वच्छता करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून, ही बाब भूषणावह आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये बहुतांश ठिकाणी राहत्या घराशेजारीच गुरे गोठ्यात बांधली जातात. कुक्कुटपालन व्यवसाय घराशेजारीच असतो. तसेच शेळ्या व मेंढ्याही यादेखील घराशेजारीच दारात बांधलेल्या आढळतात. कोंबडया, शेळ्या, मेंढ्या व गुरांच्या मलमुत्राचे व्यवस्थापन होत नाही. गुरांची व गोठ्याची स्वच्छता राहत नसल्याने अस्वच्छतेच्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढून अनेक साथींचे आजार पसरतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबत उदाहरण द्यावयाचे झाल्यास सध्या डेंग्यू आजाराने थैमान घातले असून, अनेक नागरिकांना डेंग्यू आजारामुळे प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळेत जिल्'ातील प्रत्येक गावात घराशेजारील जनावरांची व गोठ्यांची स्वच्छता राबविण्याबाबत पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून सूचना द्यावी, असे सभापती केदा अहेर यांनी पत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना सूचित केले आहे. (प्रतिनिधी)