न्यू गोदावरी चेंबरचा पदग्रहण सोहळा
By Admin | Updated: January 17, 2017 00:47 IST2017-01-17T00:46:58+5:302017-01-17T00:47:37+5:30
न्यू गोदावरी चेंबरचा पदग्रहण सोहळा

न्यू गोदावरी चेंबरचा पदग्रहण सोहळा
सातपूर : येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला़़ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आनंद मुथा, नगरसेवक शशिकांत जाधव, जेसीआयचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर दिघोळे, झोन अध्यक्ष महेंद्र चांडक, उपाध्यक्ष अजय चव्हाण आदि उपस्थित होते. मावळते अध्यक्ष नीलेश तिवारी यांनी गत वर्षाचा संस्थेचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष किरण बोरसे, सचिव लोकेश कटारिया, उपाध्यक्ष योगेश गवांदे, किरण सानप, अमेय दिघोळे, राहुल भडागे, स्वप्नील देसाई, खजिनदार रवींद्र जगताप, संचालक संदीप पाटील, किशोर शेजवळ, अशोक देशपांडे, संदीप भोजणे, सागर जावळे, महिला अध्यक्ष मंजूषा बोरसे, ज्युनियर विंग अध्यक्ष आकाश पोरजे आदि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. यावेळी जेसीआयचे माजी अध्यक्ष सुनील मराठे, चंद्रशेखर महाजन, बाळासाहेब पोरजे, पराग कुलकर्णी, योगेश मालुंजकर, अविनाश महाले आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुशीलकुमार सोनवणे, संदीप पाटील, किरण मंडल, लोकेश कटारिया, आनंद ब्राह्मणे, किरण सानप, रवींद्र जगताप, आदित्य मराठे आदिंसह जेसीआय पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)