‘अक्षर उवाच’ प्रदर्शनाचे उद्घाटन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST2021-01-25T04:15:01+5:302021-01-25T04:15:01+5:30
प्रत्येक अक्षराला त्याच्या अर्थानुसार शरीरसौष्ठव देत दोन अक्षरांतील डोळ्यांना सुखावणारा तसेच शब्दात न सांगता येणारी 'आंतरिक सेन्स' अभिव्यक्त करण्याची ...

‘अक्षर उवाच’ प्रदर्शनाचे उद्घाटन !
प्रत्येक अक्षराला त्याच्या अर्थानुसार शरीरसौष्ठव देत दोन अक्षरांतील डोळ्यांना सुखावणारा तसेच शब्दात न सांगता येणारी 'आंतरिक सेन्स' अभिव्यक्त करण्याची जादू शब्दरेषाकार सुनील धोपावकर यांच्या टायपोग्राफीत आहे. त्यांच्या बोलक्या अक्षरांचे ‘अक्षर उवाच’ या शब्द प्रदर्शनाचे उद्घाटन सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व नगरसेवक शाहू खैरे उपस्थित होते. मराठी वाचनापासून दूर गेलेल्या नव्या पिढीला वाचनसंस्कृतीशी परत जोडणारी ही अक्षरकला जगभर प्रसिद्ध झाल्याचे शाहू खैरे यांनी सांगितले. देवनागरी लिपीत ५० फॉन्ट आहेत. परंतु, इंग्रजीत दीड लाखांच्यावर फॉन्ट आहेत. भारतीय लिपीचा विषय भारतात शिकवला जात नाही, अक्षरसौंदर्य ओळखता यायला हवे असे सुनील धोपावकर यांनी मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी व सरस्वती प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत - प्रास्ताविक प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सविता कुशारे यांनी करून दिला. ज्योती फड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन गीता बागुल यांनी केले.
इन्फो
२८ पर्यंत प्रदर्शन
या बोलक्या क्षरांचे हे प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात सुरू झाले आहे. अक्षरांच्या या सोहळ्यातील प्रत्येक शब्द पाहणाऱ्याला साधा, सोपा तरीही अतिशय सुंदर आणि अर्थवाही दिसतो. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ही अनोखी शब्द पर्वणी असल्याचा सूर यावेळी करण्यात आला.