स्वातंत्र्यदिनी ४४ सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन
By Admin | Updated: August 14, 2016 02:44 IST2016-08-14T02:42:29+5:302016-08-14T02:44:08+5:30
स्वातंत्र्यदिनी ४४ सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी ४४ सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन
नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणून संशयितांना गजाआड करण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात सायबर फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला होता़या निर्णयानुसार राज्यातील पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक कार्यालये अशा एकूण ४४ ठिकाणी एकाचवेळी सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी केले जाणार आहे़
विशेष म्हणजे राज्यभरातील या फॉरेन्सिक लॅबच्या फर्निचरचे
काम नाशिकच्या कांचन असोसिएट्सने अवघ्या ४० दिवसांत पूर्ण केले आहे़
मुंबईतील महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे़
तर, नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या सायबर फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी सोमवारी (दि़१५) सकाळी १०़३० वाजता केले जाणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत़
सद्यस्थितीत ई-बॅँकिंग, आॅनलाइन शॉपिंग, सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार गुन्हेगारी कृत्ये करीत आहेत. या गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर फॉरेन्सिक लॅब उभारण्याचे आदेश गृह विभागाने दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानुसार राज्यातील ४४ ठिकाणी सायबर फॉरेन्सिक लॅब उभारण्यात आले असून, या लॅबचे उद्घाटन येत्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे़ राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा ४४ सायबर फॉरेन्सिक लॅबच्या फर्निचरचे काम अवघ्या ४० दिवसांत नाशिकच्या कांचन असोसिएट्सने पूर्ण केले आहे़ (प्रतिनिधी)