अंशकालीन शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 29, 2014 00:54 IST2014-07-29T00:38:35+5:302014-07-29T00:54:07+5:30
अंशकालीन शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन

अंशकालीन शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन
नाशिक : कला, क्रीडा व कार्यानुभव विषयक अर्धवेळ शिक्षकांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव नियुक्त शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिक्षक संघाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावर शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी शिष्टमंडळाला दिले. शिक्षक हक्क कायद्यानुसार राज्यात १८ हजार ६४५ कला, क्रीडा व कार्यानुभव विषयांतील अर्धवेळ शिक्षकांची पदे भरण्यात आली. आज या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून, राज्य शासनाने या अर्धवेळ शिक्षकांना त्वरित सेवेत घेण्याच्या मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष गायत्री मुळे, देवीदास पवार, एकनाथ चौधरी, गणेश कातकाडे, सोनल देवरे, अण्णा शिरसाट यांच्यासह अर्धवेळ शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)