शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

ठाकरेंच्या सेनेत सवंगड्यांनाच बनविले घरगडी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात, नाशिक येथे पदाधिकारी मेळावा

By suyog.joshi | Updated: May 8, 2024 20:02 IST

शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली, असे शिंदे म्हणाले.

नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही होता, जो काम करेगा वो राजा बनेगा’ असेच धोरण आमच्या पक्षात असून जो काम करेल तोच पदाधिकारी, कार्यकर्ता मोठा होतो, आमच्याकडे कोणीही मालक नाही असे सांगत उलट उध्दव सेनेत सवंगड्यांनाच घरगडी बनविले जात असल्याचा आरोप करत त्यांच्या या वागणुकीला कंटाळूनच अनेक नेते पक्षाबाहेर पडल्याचा घणाघाती प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नाशिक येथे बुधवारी (दि.८)आयोजित शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बाेलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते, आमदार सुहास कांदे, उपनेते विजय करंजकर, उमेदवार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. 

यावेळी शिंदे म्हणाले, उद्वव ठाकरे यांच्या पक्षपाती धोरणाला कंटाळूनच छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे व सर्वात शेवटी मी खासदार, आमदारांना घेऊन बाहेर पडलो. आम्हाला एवढा टोकाचा निर्णय का घ्यावा लागतोय याचाही विचार व्हायला हवा. शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली. बाळासाहेब ठाकरे यांच्याच हाती रिमोट कंट्रोल होता, ते किंग मेकर होते. त्यांच्यापुढे मुख्यमंत्रीपद हे नगण्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी सुप्त इच्छा होती. केवळ फोटोगाफी करून, फेसबूक लाईव्ह करून व घरात बसून सरकार चालवता येत नाही असाही टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेसला दूर ठेवले असते, उलट आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना जवळ केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले असून एका खूर्चीमुळे शिवसेना अडचणीत आली आहे.

राऊतांना राज्यसभेवर पाठवल्याचा पश्चातापराज्यसभेच्या निवडणुकीत माझा अपमान केला. त्याचवेळी इतर सहकारी संजय राऊत यांच्या विरोधात होते. मात्र आम्ही त्यांना मत देऊन राज्यसभेवर पाठवले. त्याचा पश्चाताप आता होत असून पुन्हा संधी मिळेलच असा इशारा देत राऊत सरपंचही निवडून येऊ शकत नाही अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ठाकरेंवर हल्लाबोलपंचवीस राज्यातले लोक माझ्यासोबत असून राजस्थानातील चार अपक्ष आमदारही माझ्या सोबत आहे.नुसतं गद्दार व खोके म्हणून चालत नाही. उद्या तुम्ही कोर्टाला व मतदारांना गद्दार म्हणायला कमी करणार नाही,अशी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीतही खंजीर खुपसला, असा आरोप शिंदे यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४