लासलगावी कांदा दरात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 09:43 PM2019-10-07T21:43:16+5:302019-10-07T21:44:16+5:30

लासलगाव : दोन दिवसांपूर्वी उतरलेले कांदा दर सोमवारी थोडेफार वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सोमवारी किमान १०००, कमाल ३८२५, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवक कमी झाल्याने दरात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Improvement in Lasalgaon onion rates | लासलगावी कांदा दरात सुधारणा

लासलगावी कांदा दरात सुधारणा

Next
ठळक मुद्दे सोमवारी मिळालेल्या दराने कांदा उत्पादकांचा वांधा थोडाफार कमी

लासलगाव : दोन दिवसांपूर्वी उतरलेले कांदा दर सोमवारी थोडेफार वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सोमवारी किमान १०००, कमाल ३८२५, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवक कमी झाल्याने दरात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी (दि. ८) दसरा सण असल्याने बाजार समितीला सुटी असून, कांदा व धान्य लिलाव बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
गत आठवड्यात कांद्याला ४२१ रुपयांची घसरण होऊन ३०२० रुपये सर्वाधिक दर जाहीर झाले होते. त्यामुळे कांदा उत्पादकात नाराजीचा सूर दिसून आला. मात्र, सोमवारी काहीप्रमाणात दर मिळाल्याने नाराजी कमी झलेली दिसून आली. देशांतर्गत किरकोळ बाजारात कांद्याचे वाढते बाजारभाव कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. तसेच बाजार समितीमधील होलसेल व्यापाºयावर कांदा साठ्यावर ५०० क्विंटल, तर किरकोळ व्यापाºयावर १०० क्विंटलपर्यंत साठवणूक करण्याची मर्यादा आणली आहे. या निर्णयामुळे व्यापाºयांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांनंतर यंदा कांद्याला चांगले दर मिळत असताना केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, सोमवारी मिळालेल्या दराने कांदा उत्पादकांचा वांधा थोडाफार कमी झाल्याने त्यांच्या चेहºयावर हसू उमटले.

Web Title: Improvement in Lasalgaon onion rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.