‘सुधारणा पर्व’; भरत जाधवकडून प्रशंसा

By Admin | Updated: July 29, 2015 00:03 IST2015-07-29T00:03:08+5:302015-07-29T00:03:45+5:30

‘सुधारणा पर्व’; भरत जाधवकडून प्रशंसा

'Improvement gala'; Bharat Jadhav praised by | ‘सुधारणा पर्व’; भरत जाधवकडून प्रशंसा

‘सुधारणा पर्व’; भरत जाधवकडून प्रशंसा



कालिदास कलामंदिर : सोनवणे यांचा पुढाकार; मूलभूत कामांना प्राधान्य

नाशिक : दीड-दोन महिन्यापूर्वी महाकवी कालिदास कलामंदिरातील सोयी-सुविधांविषयी अभिनेता भरत जाधव याने नाराजी प्रगट केल्यानंतर जागचे हललेल्या पालिका प्रशासनाकडून कालिदासमध्ये मूलभूत कामांना प्राधान्य देत सोयी-सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी पुढाकार घेऊन तडकाफडकी घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळे कालिदासमध्ये सुधारणा पर्वास प्रारंभ झाल्याने नाटकानिमित्त आलेल्या अभिनेता भरत जाधव यांनी कामांबाबत प्रशंसा करत समाधान व्यक्त केले.
महाकवी कालिदास कलमंदिरातील असुविधा आणि समस्यांविषयी अभिनेता भरत जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी कालिदासमध्ये धाव घेत जाधव यांची समजूत काढत महिनाभरात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जीवनकुमार सोनवणे यांनी ‘मिशन कालिदास’ राबवत शहरातील मान्यवर कलावंत, नाट्य परिषदेचे पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून कालिदासमधील अडचणी जाणून घेतल्या होत्या.
यावेळी बऱ्याच तक्रारींवरुन अतिरिक्त आयुक्तांनी कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांना तडकाफडकी निलंबित केले आणि त्यांच्या जागेवर प्रकाश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कालिदासमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात करण्यात आली. आता कालिदासमधील अतिथीगृहाची स्वच्छता करण्यात येऊन रंगरंगोटी करण्यात येत असून, गाद्या-उशा बदलण्यात आल्या आहेत. मेकअप रुममध्येही सुधारणा करण्यात आली आहे. तुटलेले दरवाजे बदलण्यात आले आहेत.
कालिदासच्या तळमजल्यावर साचलेले भंगारही हटविण्यात आले असून, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कलावंतांसाठी भोजनाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. येत्या एक-दोन दिवसात त्याठिकाणी डायनिंग टेबल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कलावंतांच्या भोजनासाठी कायमस्वरुपी सुविधा कालिदासच्या गच्चीवर डोम टाकून उपलब्ध करून दिली जाणार आहे. रंगमंचावरीलही त्रुटी दूर करण्यावर भर दिला जात असून, लवकरच एक हजार वॅटस्चे दिवे बसविले जाणार आहेत. कालिदासमधील ही सुधारणा पाहून रविवारी एका नाटकाच्या ‘चॅरिटी शो’साठी आलेल्या भरत जाधवने समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Improvement gala'; Bharat Jadhav praised by

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.