न्यायडोंगरी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: June 2, 2014 00:38 IST2014-06-01T21:07:57+5:302014-06-02T00:38:51+5:30

न्यायडोंगरी, दि. २ : येथे छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी सोशल मिडीयाच्या (फेसबुक) माध्यमातून समाजकंटकाने केलेले आक्षेपार्ह बदनामकारक मजकुराचा निषेधार्थ न्यायडोंगरी बंदला प्रतिसाद लाभला.

Improved response to the judiciary bandla | न्यायडोंगरी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्यायडोंगरी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्यायडोंगरी, दि. २ : येथे छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी सोशल मिडीयाच्या (फेसबुक) माध्यमातून समाजकंटकाने केलेले आक्षेपार्ह बदनामकारक मजकुराचा निषेधार्थ न्यायडोंगरी बंदला प्रतिसाद लाभला.
शिवसेना शाखेकडून न्यायडोंगरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील नागरिकांत तीव्र संताप पसरला आहे. याचाच एक भाग म्हणून न्यायडोंगरी शिवसेना शाखेने गाव बंदचे आवाहन केले. यात व्यापारी वर्गाने स्वयंमस्फूर्तीने दिवसभर आपला व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदला. शिवसेना शाखेचे वतीने समाजकंटक आरोपीस कठोर कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन न्यायडोंगरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार एल. पी. कडभाने यांना दिले. यावेळी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य शशिकांत मोरे, संजय आहेर शिवसेना शहर प्रमुख व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Improved response to the judiciary bandla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.