नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरी करणारा आरोपी अनिल पांडुरंग पाटील (रा़ मोरे मळा, रामनगर, रामवाडी, पंचवटी) यास प्रथमवर्ग दंडाधिकारी व्ही़पी़ केदार यांनी शुक्रवारी (दि़ ७) सात महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली़भद्रकाली परिसरातील अमर कन्होजे यांची रिक्षा २८ जानेवारी २०१८ रोजी आरोपी अनिल पाटील याने चोरून नेली होती़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बी़एस़ खरे यांनी केला होता़ सरकारी वकील आऱए़ पाटील यांनी या न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडली़ तर पोलीस शिपाई बी़ झेड. सलगर यांनी शिक्षा लागण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला़
रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:53 IST