उपनगर, सातपूर येथे जुगार अड्ड्यांवर छापे

By Admin | Updated: June 12, 2017 01:10 IST2017-06-12T01:10:14+5:302017-06-12T01:10:33+5:30

उपनगर, सातपूर येथे जुगार अड्ड्यांवर छापे

Impressions on gambling bases in suburb, Satpur | उपनगर, सातपूर येथे जुगार अड्ड्यांवर छापे

उपनगर, सातपूर येथे जुगार अड्ड्यांवर छापे

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उपनगर व सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून साडेचार हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रबुद्धनगरसमोरील शारदा कंपनीच्या भिंतीजवळ संशयित लाल्या जयवंत बागुल (संतोषी माता झोपडपट्टी) व त्याचे सहा साथीदार अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या सातही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ हजार २० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर झोपडपट्टीतील मोकळ्या जागी संशयित अरुण सदाशिव साळवे, विक्रम अशोक बांगर व अशोक प्रल्हाद पवार हे अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ उपनगर पोलिसांनी शनिवारी (दि़१०) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला़
या तिघांकडून एक हजार ६३० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Impressions on gambling bases in suburb, Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.