शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा  जागतिक स्तरावर ठसा उमटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:34 IST

कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. 

ठळक मुद्देराज्यपाल कोश्यारी : दीक्षांत साेहळ्यात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

नाशिक :   कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. महाराष्ट्र आरोग्य  विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (दि.२९) ऑनलाइन पद्धीतीने पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी  एन.व्ही. कळसकर आदी उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,  आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. त्यामुळे या गोष्टी दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी विद्यापीठाने प्रयत्नशील रहावे.  प्राध्यापक आणि  विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन जागतिक स्तरावर  विद्यापीठाचा ठसा उमटविण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आढावा सादर करतानाच विद्यापीठ आवारात लवकरच विविध वैद्यकीय अभ्यसक्रमांचे महाविद्यालय सुरू होणार असल्याचे सांगितले. ८५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक; तिघांना पीएच.डी.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात  विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या ८ हजार ६४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात वेगवेगळ्या विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ८५ विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या ३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. 

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी