शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:26 IST

राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शहरात गोल्फ क्लब मैदान येथे शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देविविध मागण्या : जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

नाशिक : राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शहरात गोल्फ क्लब मैदान येथे शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना केंद्र शासनाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह सर्व आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन आणि त्यानंतर २३ जानेवारीला तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात गेल्या साडेचार वर्षांत शिक्षणमंत्र्यांकडे अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र आश्वासनापलीकडे काहीही मिळालेले नाही. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून, त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली आहेत. दि. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सदर मागण्या मार्गी लावण्याचे देण्यात आलेले आश्वासन शासनाने पाळलेले नाही असे असताना दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबतचा अन्यायकारक शासन आदेश काढण्यात आला, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव अनिल महाजन यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.अशा आहेत मागण्यासर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करून त्यांना त्वरित अनुदान द्यावे. माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा, २४ वर्षे झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट वेतनश्रेणी द्यावी, २०११-१२ पासूनच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजुरी देऊन व २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावी, २०१२-१३ पासून नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन द्यावे, नियुक्ती मान्यता मिळाल्यानंतर तातडीने वेतन सुरू करावे व शालार्थ प्रणालीत नावे समाविष्ट करण्यासाठी पूर्वीप्रमाणे वेतन अधीक्षकांना अधिकार द्यावे यांसह विविध ३४ मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकagitationआंदोलन