जिल्हा बदली शिक्षकांची कार्यमुक्ती रोखावी शिक्षण समिती सभेत महत्त्वपूर्ण ठराव
By Admin | Updated: December 31, 2014 00:55 IST2014-12-31T00:54:51+5:302014-12-31T00:55:12+5:30
जिल्हा बदली शिक्षकांची कार्यमुक्ती रोखावी शिक्षण समिती सभेत महत्त्वपूर्ण ठराव

जिल्हा बदली शिक्षकांची कार्यमुक्ती रोखावी शिक्षण समिती सभेत महत्त्वपूर्ण ठराव
नाशिक : आंतर जिल्हा बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या शिक्षकांना नोटिसा काढण्यात याव्यात व तोपर्यंत जिल्हा बदलीने बाहेर जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नये असा महत्त्वपूर्ण ठराव आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला़ शिक्षण समितीचे सभापती किरण थोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा पार पडली़ जिल्'ामध्ये प्राथमिक तसेच पदवीधर शिक्षकांच्या ८४९ जागा रिक्त आहेत़ या शिक्षकांना पदोन्नती नसल्याने या जागा कायम रिक्त राहत आहेत़ यापैकी १९० जागा या जिल्हाबदल झालेल्या शिक्षकांच्या आहेत़ मात्र बदली होऊनही हे शिक्षक बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत़ यामुळे प्रत्यक्ष जागा रिक्त असतानाही केवळ बदली शिक्षकांमुळे त्या भरल्या जात नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ यामुळे या शिक्षकांना नोटीस देण्यात यावी नोटिसीनंतरही एक महिन्यात सदर शिक्षक हजर झाले नाहीत, तर त्या रिक्त जागा नवीन भरतीप्रक्रि येतून भरण्यात याव्यात़ तसेच तोपर्यंत जिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नये असा ठराव करण्यात आला़ सदस्य अशोक जाधव यांनी हा ठराव मांडला़ यासह सदस्य तसेच सभापतींनी शिक्षण विभागातील अधिकारी तसेच शिक्षकांच्या बदलीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बिंदू नामावली रजिस्टरबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना विचारणा केली़ हे रजिस्टर महत्त्वपूर्ण असल्याने बिंदू नियमावली तपासून रजिस्टर कायम अद्यावत करण्यात यावे, १० जानेवारीला बिंदू नियमावली रजिस्टर हजर करावे, जातप्रमाण पत्र व त्यांची सत्यता तपासावी अशा सूचना दिल्या़ सभेस शिक्षण समितीचे सदस्य प्रवीण गायकवाड, अशोक जाधव, सुनीता पाटील, चंद्रकांत वाघ, शिक्षणाधिकारी आऱ एस़ मोगल आदि उपस्थित होते़