मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबरोबरच पुस्तके व्यवस्थापन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By Admin | Updated: November 30, 2014 00:45 IST2014-11-30T00:44:29+5:302014-11-30T00:45:03+5:30
मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबरोबरच पुस्तके व्यवस्थापन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबरोबरच पुस्तके व्यवस्थापन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर एक महिन्यात पुस्तके उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके उपलब्ध होतील अशांना प्रवेश शुल्कातून सूट दिली जाईल. जे विद्यार्थी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा वापर करतील त्यांनाही सवलत देण्याचे या बैठकीत मान्य करण्यात आले. विद्यापीठात आज व्यवस्थापन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर पुस्तके तत्काळ मिळावीत यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे सर्व शिक्षणक्र मांच्या विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके उपलब्ध होणार आहेत़ तसेच विद्यापीठाच्या मुख्यालय आणि सर्व विभागीय केंद्रात वित्तीय कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी प्रथमच समान लेखा संहिता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्व विभाग प्रमुखांना काही वित्तीय अधिकार देण्याबरोबरच काही जबाबदाऱ्याही दिल्या जाणार आहेत.