एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या गुणवंतांचा गौरव
By Admin | Updated: June 27, 2017 00:46 IST2017-06-27T00:46:34+5:302017-06-27T00:46:51+5:30
नाशिक : एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या गुणवंतांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
व्यक्तींना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव व नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार सोहळा रोटरी सभागृहात
थाटामाटात पार पडला. महिंद्र अॅन्ड महिंद्र व यश फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कमलाकर घोंगडे, नामदेव येलमामे, अरु ण धोरे, भूषण सुरजुसे, योगेश परदेशी, संगीता पवार आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच नवविवाहित दाम्पत्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालकांनाही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. या मुलांनी आपले आरोग्य सांभाळून बिकट परिस्थितीवर मात केली आणि चांगले गुण मिळवून यशाचा पहिला टप्पा गाठला आहे, ही बाब निश्चित कौतुकास्पद असल्याचे घोंगडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक फाउण्डेशनचे संचालक रवींद्र पाटील यांनी केले.