मानवी हक्कांचे महत्त्व अनन्यसाधारण : अॅड. पवार कळवण : महाविद्यालयात ज्ञानविस्तार कार्यक्र मांतर्गत व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:36 IST2019-12-11T17:35:38+5:302019-12-11T17:36:28+5:30
कळवण : मानवाला समानता आणि प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या मूलभूत कल्पनेचा व्यापकपणे केलेला विचार म्हणजे जीवन जगण्याचा आधुनिक व प्रगल्भ विचार असून, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वर्ण, लिंग, संस्कृती, त्यांचे मतप्रवाह व राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडे असणाऱ्या हक्कांचे जागतिक स्वरूप मानवी हक्क संकल्पनेत समाविष्ट असल्याने मानवी हक्कांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी व्यक्त केले.

कळवण महाविद्यालयात मानवी हक्क विषयावर बोलताना अॅड. शशिकांत पवार.समवेत प्राचार्य डॉ.यु.आर.शिंदे ,सुधीर पगार,राजेंद्र कापडे ,निंबा कोठावदे
कळवण : मानवाला समानता आणि प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या मूलभूत कल्पनेचा व्यापकपणे केलेला विचार म्हणजे जीवन जगण्याचा आधुनिक व प्रगल्भ विचार असून, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वर्ण, लिंग, संस्कृती, त्यांचे मतप्रवाह व राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडे असणाऱ्या हक्कांचे जागतिक स्वरूप मानवी हक्क संकल्पनेत समाविष्ट असल्याने मानवी हक्कांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे ज्ञानविस्तार कार्यक्र मांतर्गत मानवी हक्क या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. यू. आर. शिंदे होत्या.अॅड. पवार पुढे म्हणाले की,
गुलामगिरी अस्तित्वात असताना त्यात लोकांना अमानवी व अमानुष वागणूक दिली जात होती. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी मुक्तीसाठी मोठे प्रयत्न केले. सर्व मानव समान असल्याने मार्टिन ल्यूथर किंगने सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी मोठा लढा दिला. भारतातही अनेक वर्ष जातीधर्म भेदभाव, सतीसारख्या अमानुष कुप्रथाविरोधात समाजसुधारकांनी लढा देऊन मानवी हक्कांची जाणीव करून दिल्याचे अॅड. पवार म्हणाले. प्रा.पी.एम. जाधव यांनी राज्यघटनेतील विविध कलमे, हक्क यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य यू. आर. शिंदे यांनी मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. यू. के. पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एम. बी. घोडके यांनी केले. कार्यक्र मास उपप्राचार्य एन.के.आहेर, गांगुर्डे, नंदनवरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.