गोंदेदुमालात कडक निर्बंधांची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:33 IST2021-05-12T22:16:26+5:302021-05-13T00:33:46+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे दुमाला परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच शरद सोनवणे यांनी म्हटले आहे.

गोंदेदुमालात कडक निर्बंधांची अंमलबजावणी
ठळक मुद्दे इतर कुठलीही दुकाने सुरू नाहीत.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे दुमाला परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच शरद सोनवणे यांनी म्हटले आहे.
गोंदे दुमाला येथे मुख्य रस्ते, दुकाने, आदींसह औद्योगिक वसाहतीतील परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात असून अत्यावश्यक सेवावगळता इतर कुठलीही दुकाने सुरू नाहीत. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे रस्त्यावर असणारी गर्दी दुपारी बारा वाजल्यानंतर कमी झाली.