साताळीत सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 15:44 IST2020-04-01T15:43:46+5:302020-04-01T15:44:09+5:30
तालुक्यातील साताळी येथे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांच्या प्रयत्नातून गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करीत गावातच भाजीपाला विक्र ीचे स्टॉल लावले आहेत.

साताळी येथे भाजीपाला खरेदीसाठी ग्रामस्थांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे.
येवला : तालुक्यातील साताळी येथे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांच्या प्रयत्नातून गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करीत गावातच भाजीपाला विक्र ीचे स्टॉल लावले आहेत. ग्रामस्थांनीही शिस्तीचे पालन करत सुरक्षित अंतर राखत भाजीपाला खरेदीला प्रतिसाद दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असून उपाययोजना म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायतकडून गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच गावात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे.