लोकसंख्या नियंत्रणासाठी अंमलबजावणी महत्त्वाची
By Admin | Updated: July 15, 2014 00:45 IST2014-07-14T23:57:35+5:302014-07-15T00:45:36+5:30
लोकसंख्या नियंत्रणासाठी अंमलबजावणी महत्त्वाची

लोकसंख्या नियंत्रणासाठी अंमलबजावणी महत्त्वाची
नाशिक : लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमुळे नैसर्गिक संसाधनांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम भविष्यातील सर्वांगीण बाबींवर होणार असल्याने चांगल्या जीवनासाठी लोकसंख्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन रेडक्रॉसचे मानद सचिव मेजर पी. एम. भगत यांनी
केले.
रविवार कारंजा येथील रेडक्रॉस येथे ते बोलत होते. यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा, रेडक्रॉसच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. नितीन बिर्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रेडक्रॉसच्या शहरी आरोग्य सेवा केंद्राच्या परिवार कल्याणाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)