शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
4
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

उत्पन्नवाढीसाठी व्हावी पर्यायी उपायांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:59 AM

कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्षभर बंद असल्याने त्यातूनदेखील उत्पन्न शून्य आहे.

नाशिक : कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्षभर बंद असल्याने त्यातूनदेखील उत्पन्न शून्य आहे. त्यामुळे या दोन्ही बाबींची व्यवस्थित सांगड घालत फुले कलादालनाचा कल्पक वापर केला, तर कालिदास कलामंदिराला आत्मनिर्भर करणे शक्य आहे.कालिदास कलामंदिराला आत्मनिर्भर करण्यासाठी केवळ तेथील व्यावसायिक नाटकांवरच अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्यासाठी महापालिकेला कालिदास आणि त्याशेजारील फुले कलादालनाचा कल्पक वापर करण्याची आवश्यकता आहे. गॅदरिंग, स्नेहसंमेलने, कार्यशाळांची खानपान व्यवस्था फुले कलादालनाखालील जागेत करून ते कार्यक्रमदेखील प्राइम टाइम नसलेल्या दुपारच्या सत्रांमध्ये घेण्यास कुणाचीच हरकत राहणार नाही. तसेच कालिदासचे उत्पन्नदेखील वाढू शकेल. महानगरातील सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या आणि कलाप्रेमी नागरिकांची भूक वाढत असताना फुले कलादालन वर्षभर जवळपास बंद अवस्थेत पडून राहणे कितपत योग्य आहे. महापालिकेच्या या कोट्यवधींच्या मिळकती अशा धूळ खात पडण्यापेक्षा त्यांचा समर्पक वापर करण्यासाठी कला क्षेत्राशी निगडीत मान्यवरांची आणि त्या विषयांवर काम करू इच्छिणाऱ्यांसह त्याकरिता वेळ देऊ शकणाऱ्यांची समिती गठीत करून त्यांच्या अहवाल आणि मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.सिनेनाट्यगृहाच्या पर्यायाचाही विचार व्हावाएकीकडे कालिदाससारखे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण नाट्यगृह सकाळ आणि दुपारच्या दोन सत्रांमध्ये प्रामुख्याने रिकामेच असते. केवळ शनिवारी आणि रविवारच्या दोन दिवसांतच त्यात दोन किंवा तीन सत्रांमध्ये नाटके किंवा कार्यक्रम होतात, तर दुसरीकडे हल्ली सामान्य नागरिकाला मल्टिफ्लेक्समध्ये जाऊन एकेका तिकिटाला २५०-३०० रुपये याप्रमाणे कुटुंबासह सिनेमा बघण्यासाठी दीड हजार रुपये एकावेळी खर्च करणे परवडत नाही. मग अशा सामान्य नागरिकांसाठी १००-१५० रुपयांमध्ये चित्रपटांचे दोन शो सकाळी व दुपारच्या वेळेत ठेवले तरी अनेक बाबी शक्य होतील. मुंबई आणि ठाण्यात अशा प्रकारच्या पर्यायांवर विचारमंथन होत आहे. त्यासाठी व्यासपीठावर काही किरकोळ बदल तसेच मंजुरी घेण्यासह विशेष परवानग्या घेऊन मगच त्याची अंमलबजावणी करावी लागेल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcultureसांस्कृतिक