शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळाचा प्रभाव, नाशिकमध्ये पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 10:31 IST

जनजीवन विस्कळीत : चाकरमन्यांसह विद्यार्थीवर्गाची गैरसोय

ठळक मुद्देओखी चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्टसह राज्यातील बव्हंशी भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आज सकाळपासून नाशिकमध्ये सूर्यदर्शन झालेले नाही.

नाशिक - ओखी वादळाचा परिणाम नाशिक शहरावरही दिसून येत असून सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्यासह कोसळणाऱ्या  पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या  चाकरमन्यांसह विद्यार्थीवर्गाची गैरसोय होताना दिसून येत आहे.अरबी समुद्रातूून पुढे मुंबईपर्यंत धडकलेल्या ओखी चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्टसह राज्यातील बव्हंशी भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या वादळाचा परिणाम म्हणून नाशिकमध्ये आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. सोमवारी दुपारपासूनच शहरात आभाळ भरुन आले होते तर आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. हवेत कमालीचा गारठा असून थंडीत पावसाची भर पडल्याने बाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. याशिवाय, हलकेसे वारे वाहत असल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली आहे. सकाळी-सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या  चाकरमन्यांची तसेच शाळेत जाणाऱ्या  विद्यार्थ्यांची धांदल उडाली. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शहरातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीवर परिणाम दिसून येत आहे. थंडी आणि पाऊस असा दुहेरी माऱ्या मुळे त्रस्त बनलेल्या नाशिककरांनी बाहेर न पडणेच पसंत केले आहे. थंडीमुळे अडगळीत टाकून देण्यात आलेले रेनकोटही यानिमित्ताने बाहेर निघाले आहेत. आज सकाळपासून नाशिकमध्ये सूर्यदर्शन झालेले नाही.

 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस