पिकांवर भुरी करपा, डावणी रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:41 PM2019-11-24T17:41:45+5:302019-11-24T17:41:51+5:30

पाटोदा :- मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत जतन केलेल्या द्राक्षबागा यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडल्या आहेत. बागांवर भुरी,करपा, डावणी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडिपीनंतर पडत असलेल्या गेल्या धुक्यामुळे तसेच पहाटेच्या थंडी व दवबिंदूमुळे कुज तसेच गुंडाळी होऊन घड जागेवरच विरघळत आहेत.

 Impact of brown diseases on the crops, camping diseases | पिकांवर भुरी करपा, डावणी रोगांचा प्रादुर्भाव

पिकांवर भुरी करपा, डावणी रोगांचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्दे शेतकरी हवालदिल : पाटोदा मंडलातील ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात



पाटोदा :- मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत जतन केलेल्या द्राक्षबागा यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडल्या आहेत. बागांवर भुरी,करपा, डावणी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडिपीनंतर पडत असलेल्या गेल्या धुक्यामुळे तसेच पहाटेच्या थंडी व दवबिंदूमुळे कुज तसेच गुंडाळी होऊन घड जागेवरच विरघळत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बागा जागविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असून, महागडी औषधे फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने पाटोदा मंडलातील ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात आल्या असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.

एकट्या पाटोदा कृषी मंडळात सातशे चार हेक्टर द्राक्ष बागांची शेतकऱ्यांना लागवड केली आहे.आॅक्टोबर छाटणी नंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेवरील सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के घड खराब झाले.त्यामुळे द्राक्षउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.उर्वरित घडही धुके व दविबंदूमुळे धोक्यात आले आहे. सध्या हवामानात बदल झाल्यामुळे रोज सकाळ दुपार संध्याकाळ अशी तीन वेळ औषध फवारणी करावी लागत आहे.दिवसाकाठी एक एकर द्राक्षबागेवर सुमारे पाच हजार रु पयांची औषधे लागत आहे.कर्ज काढून बागा वाचिवण्यासाठी धडपड करूनही रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. द्राक्ष बागांसाठी शेतकºयांनी लाखो रु पयांची गुंतवणूक केली त्यासाठी शेतकरी वर्गाने,बँका,पतसंस्था तसेच खाजगी सावकारांकडून मोठया प्रमाणत कर्ज उचलले आहे.तसेच यावर्षीच्या हंगामासाठी व निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्यासाठी हेक्टरी पाच ते सहा लाख रु पयांचा खर्च केला मात्र परतीच्या या अवकाळी पावसाने शेतकºयांचे हेक्टरी वीस ते बावीस लाख रु पयांचे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे.

 परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे वाटोळे केले आहे बागांवर डावणी तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे दिवसाकाठी एकरी पाच ते सात हजार रु पयांचे महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे ही औषध फवारणी करूनही बदलत्या हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होन्याऐवजी वाढतच आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.-रवींद्र शेळके, द्राक्ष उत्पादक शेतकरी ठाणगाव

 कोरड्या दुष्काळाचा सामना करीत द्राक्ष उत्पादन करणाº्या द्राक्ष उत्पादक शेतकº्यांना यावर्षी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.या ओल्या दुष्काळामुळे संपूर्ण द्राक्ष बागा शोभेच्या झाल्या आहेत. तब्बल महिनाभर पावसाने धुमाकूळ घातल्याने या बागांमध्ये अद्यापही चिखल व दलदल आहे.येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातीलपाटोदा,दहेगावपाटोदा,ठाणगाव,पिंपरी,धुळगाव,कानडी,विखरणी,आडगाव रेपाळ,शिरसगाव,लौकी,वळदगाव,पिंपळगावलेप, जऊळ्के,सतारे आदि भागात द्राक्ष पिकांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे.

पाटोदा कृषी मंडळात सुमारे सातशे हेक्टर द्राक्ष बागांची शेतकरी वर्गाने लागवड केली आहे मात्र परतीच्या पावसाने या संपूर्ण द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहे .त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे .कृषी विभागाच्या वतीने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना औषध फवारणी बाबत मारगदर्शन केले जात आहे,- प्रकाश जवणे, कृषी सहाय्यक पाटोदा कृषी मंडळ.
 

Web Title:  Impact of brown diseases on the crops, camping diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.