फुगवणीवर परिणाम

By Admin | Updated: January 12, 2017 01:28 IST2017-01-12T01:27:57+5:302017-01-12T01:28:08+5:30

पारा ५ अंशांवर : द्राक्ष उत्पादक हवालदिल

Impact of the balloon | फुगवणीवर परिणाम

फुगवणीवर परिणाम

कसबे सुकेणे/निफाड : निफाड परिसरात बुधवारी ५ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाल्याची माहिती येथील गहू संशोधन केंद्राने दिली. याचा परिणाम द्राक्ष फुगवणीवर होत असल्याने व थंडीचा कडाका अजून वाढण्याच्या भीतीने मात्र शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिंपळगाव बसवंत, सुकेणे या भागात तपमान ५ अंशाखाली घसरले असून, थंडीच्या कडाक्यामुळे तालुक्यातील गावे अक्षरश: गारठली असून, द्राक्ष फुगवणीवर मोठा परिणाम होत आहे. कादवा, गोदावरी आणि बाणगंगा या नद्यांच्या खोऱ्यामुळे निफाडची थंडी राज्यात चर्चेत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील थंडीचा नीचांक निफाडमध्ये नोंदविला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीचा पारा सातत्याने घसरत आहे. राज्यात सातत्याने नीचांकी तपमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी, पिंपरी, सुकेणे, चांदोरी, कोकणगाव, पिंपळगाव या भागात होत आहे. त्यामुळे थंडीमुळे निफाड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. निफाड तालुक्यासह कादवा, बाणगंगा, गोदा खोऱ्यात थंडीचा जोर कायम आहे. पिंपळगाव, निफाड, सुकेणे, ओझर या भागातील द्राक्षांना या थंडीचा फटका बसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Impact of the balloon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.