जिल्ह्यातील १९ लाख बालकांचे लसीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:09 AM2018-11-15T00:09:41+5:302018-11-15T00:10:41+5:30

बालकांना जीवघेणा ठरू पाहणाऱ्या गोवर आजारापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील १९ लाखांहून अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात येणार असून, या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे आणि लसीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.

 Immunization of 19 lakhs of children in the district | जिल्ह्यातील १९ लाख बालकांचे लसीकरण करणार

जिल्ह्यातील १९ लाख बालकांचे लसीकरण करणार

Next

नाशिक : बालकांना जीवघेणा ठरू पाहणाऱ्या गोवर आजारापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील १९ लाखांहून अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात येणार असून, या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे आणि लसीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जगात २०१६ मध्ये गोवरमुळे १ लाख ३४ हजार बालके मृत्युमुखी पडली असून, त्यातील ४९ हजार बालके भारतातील आहेत. या आजारामुळे बालकांवर अंधत्व, पंगुत्व, डायरिया, निमोनिया आदी परिणाम होऊ शकतो. रुबेलाचा संसर्ग गर्भवती मातेस झाल्यास अर्भक मृत्यू किंवा जन्माला येणाºया बालकात जन्मजात दोष उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे या आजाराचा नायनाट करण्यासाठी जिल्ह्यातील १९ लाख २३ हजार ९७० बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यापैकी १ लाख ९३ हजार ८२२ मालेगाव महापालिका, ४ लाख ९० हजार २८८ नाशिक महापालिका आणि ११ लाख ४० हजार ४४८ ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत २० राज्यांतील १२ कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशियाना, कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे आदी उपस्थित होते.
नागरिकांचे  करणार प्रबोधन
जिल्हाधिकारी राधाकृष्णन पुढे म्हणाले, प्रथमच लसीकरण इंजेक्शनद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांचे प्रबोधन करण्यावर विशेष भर देण्यात यावा. मोठ्या संख्येने लसीकरण होणार असल्याने तालुकानिहाय सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. शाळांमधून पालकांच्या बैठका घेऊन त्यांना लसीकरणाबाबत माहिती देण्यात यावी. तालुका स्तरावर आवश्यक मनुष्यबळ, लसींचा पुरवठा, आवश्यक साधनसामग्रीबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title:  Immunization of 19 lakhs of children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.