‘श्रीं’ चे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:32+5:302021-09-21T04:17:32+5:30

इंदिरानगर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ जय घोषणा देत आणि कोरोना महामारीचे विसर्जन कर ...

Immersion of 'Shree' in an emotional atmosphere! | ‘श्रीं’ चे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !

‘श्रीं’ चे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !

इंदिरानगर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ जय घोषणा देत आणि कोरोना महामारीचे विसर्जन कर अशी प्रार्थना करीत परिसरात श्री गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक श्रींचे विसर्जन करण्यात आल्यामुळे नागरिक जागृत झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच घराघरात आणि मंडळांमध्ये श्रीं च्या निरोपाची तयारीची लगबग सुरू होती. काही नागरिकांनी श्रीं च्या शाडूच्या मातीची मूर्तीचे विसर्जन घरीच केले. भाजपप्रणीत ग्रुपच्या वतीने श्री युनिक ग्रुपच्या मैदानावर तलावात विसर्जन करून मूर्ती दान करण्यात आली. यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे , अनिता सोनवणे, अनिकेत सोनवणे, अनिल जाचक, किशोर शिरसाठ, रोहित परब, ऋषिकेश शिरसाठ, नवनाथ चव्हाण, शिवाजी लोखंडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. श्री प्रतिष्ठानच्या श्रींचे विसर्जन करण्यात आले यावेळी नगरसेवक ॲड. शाम बडोदे, उदय बडोदे, जयवंत टक्के ,गोपाळ आव्हाड यांच्यासह सदस्य उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मित्रमंडळाच्या वतीने श्रींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नगरसेवक चंद्रकांत खोडे, संकेत खोडे, खलील शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते. इंदिरानगर उत्सव समितीच्या विसर्जन श्रींचे विसर्जन नगरसेवक सुप्रिया खोडे व माजी नगरसेवक सुनील खोडे यांच्या हस्ते करण्यात आले. शंभू नारायण ग्रुप , ओम साई मित्रमंडळ, समर्थ मित्रमंडळ, राजे छत्रपती युवक मित्रमंडळ, वैभव कॉलनी मित्रमंडळ, इच्छा मूर्ती बहुउद्देशीय मित्रमंडळ, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान,सह विविध मंडळांनी श्रींचे विसर्जन केले.

Web Title: Immersion of 'Shree' in an emotional atmosphere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.