भगूरला दारणात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:58+5:302021-09-21T04:15:58+5:30
भगूर : भगूर नगरपालिकेच्या वतीने दारणा नदीत हजारो गणेशमूर्तींचे भक्तांकडून उत्साहात विसर्जन करण्यात आले. सकाळपासून भगूर नगरपालिकेच्या वतीने नदीकाठावर ...

भगूरला दारणात विसर्जन
भगूर : भगूर नगरपालिकेच्या वतीने दारणा नदीत हजारो गणेशमूर्तींचे भक्तांकडून उत्साहात विसर्जन करण्यात आले. सकाळपासून भगूर नगरपालिकेच्या वतीने नदीकाठावर मंडप टाकून निर्माल्यदान करण्याची सोय करून देण्यात आली हाेती. स्वतः पालिका कर्मचारी गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करत होते. यावेळी पालिका मुख्य लिपिक रमेश राठोड, मुकादम परशूजी कुटे, पाणीपुरवठाप्रमुख रवींद्र संसारे, दिलीप वाघ यांच्यासह ४५ कामगारांनी उत्कृष्ट नियोजन केले. मांगीरबाबा चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर आयोजित गणेश उत्सवात विसर्जन एकत्रित येऊन न करता आपण मूर्ती दान करावी असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले होते. त्याला भगूरमधील नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत ३००हून अधिक नागरिकांनी गणेशमूर्ती दान केल्या. यावेळी मनविसेचे सुमित चव्हाण, श्याम देशमुख, संतोष सोनवणे, यश राजपूत, सौरभ मोजाड, मयूर चव्हाण, स्वप्निल देशमुख, संदेश देशमुख, नीलेश गायकवाड यांनी नियोजन करून गणेशमूर्ती दानासाठी परिश्रम घेतले.