भोकणीत थकीत कर भरल्यास शिवार रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:02 IST2020-08-04T22:44:37+5:302020-08-05T01:02:32+5:30
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी नवीन फंडा राबविण्यास सुरुवात केली असून, थकीत मालमत्ता करांचा १०० टक्के भरणा केल्यास गावातील शिवार रस्त्यांची मोफत दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

भोकणीत थकीत कर भरल्यास शिवार रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी नवीन फंडा राबविण्यास सुरुवात केली असून, थकीत मालमत्ता करांचा १०० टक्के भरणा केल्यास गावातील शिवार रस्त्यांची मोफत दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सरपंच ज्योती वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या मासिक बैठकीत हा लोकोपयोगी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. उपसरपंच शरद साबळे, सदस्य शोभा कुºहाडे, भिवाजी कुºहाडे, सोनाली साबळे, रंगनाथ सानप, भारती सानप, बस्तीराम सानप, ग्रामसेवक एम. एम. मोरे आदी यावेळी उपस्थित होते. थकीत मालमत्ता करांचा एकत्रित भरणा करणाऱ्या आणि रानशिवारात राहणाºया ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ता करांचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही त्यांच्याकडून सहकार्य केले जात नाही.