बिंदुनामावली, अनुशेष भरतीविषयी तत्काळ निर्णय घ्या : दौलत दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:06+5:302021-08-27T04:19:06+5:30
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध योजना, उपक्रमांमध्ये अनुसूचित जमातीतील व्यक्तींना प्राधान्य देण्यासोबतच शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे बिंदुनामावली ...

बिंदुनामावली, अनुशेष भरतीविषयी तत्काळ निर्णय घ्या : दौलत दरोडा
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध योजना, उपक्रमांमध्ये अनुसूचित जमातीतील व्यक्तींना प्राधान्य देण्यासोबतच शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे बिंदुनामावली व अनुशेष भरतीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना विधिमंडळ अनुसूचित जमाती समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा यांनी विद्यापीठ प्रशासनाला केल्या आहेत. त्यासोबतच अनुसूचित जमातीतील कोविड-१९ आजाराने दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही समितीतर्फे यावेळी करण्यात आल्या
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या विधिमंडळ अनुसूचित जमाती समितीच्या बैठकीत आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समिती सदस्यांनी कोविड कालावधीतील आव्हानात्मक परिस्थितीत विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे ठरल्याचे नमूद केले. या बैठकीला आमदार शिरीष चौधरी, राजकुमार पटेल, किरण सरनाईक, रमेशदादा पाटील, राजेश पाडवी, अनिल पाटील, श्रीनिवास वनगर, डॉ. तुषार राठोड, अमरनाथ राजूरकर, मंत्रालयाचा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा, सद्यस्थितीतील मनुष्यबळाची माहिती समितीसमोर सादर केली.
260821\26nsk_10_26082021_13.jpg
महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठातील बैठकीला उपस्थिती विधिमंडळ अनुसुचित जमाती समितीचे सदस्य