सेमी इंग्रजी शाळांना तातडीने मान्यता

By Admin | Updated: April 8, 2017 22:53 IST2017-04-08T22:53:01+5:302017-04-08T22:53:15+5:30

सिन्नर : सेमी इंग्रजीच्या वर्गांना तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिले.

Immediate approval for Semi English schools | सेमी इंग्रजी शाळांना तातडीने मान्यता

सेमी इंग्रजी शाळांना तातडीने मान्यता

 सिन्नर : शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासह सेमी इंग्रजीच्या वर्गांना तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिले.
सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांची संयुक्त सहविचार सभा येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात पार पडली. त्यावेळी शिक्षणाधिकारी औताडे बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, विज्ञान संघटनेचे अध्यक्ष एस. टी. पांगारकर, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. शिंदे, ब. ना. सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, बी. व्ही. पांडे, यू. बी. आव्हाड, आर. बी. रणशेवरे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मूल्यांकन झालेल्या ९६ शाळांपैकी ८७ शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित शाळांचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे औताडे यांनी सांगितले. निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी विना अट देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे सादर केला असून हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन औताडे यांनी दिले.
सिन्नर तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळा या डिजिटल झाल्या असून उर्वरित शाळा लवकरच डिजिटल होतील, असे गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मळ यांनी सांगितले. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी निर्मळ यांनी यावेळी केली.
यावेळी एम. डी. काळे, डी. टी. भाबड, शरद रत्नाकर, विद्या साळुंखे, यू. व्ही. आव्हाड, शिवाजी रहाटळ, के. बी. ढोली, सुधीर मिठे, एस. जी. सोनवणे, आर. बी. एरंडे, के. एम. मोरे तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Immediate approval for Semi English schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.