आयएमए राज्य शाखेकडे डॉ. लहाडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
By Admin | Updated: April 8, 2017 13:02 IST2017-04-08T13:02:52+5:302017-04-08T13:02:52+5:30
आयएमए नाशिकच्या सहसचिव म्हणून निवडल्या गेलेल्या वादग्रस्त स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ वर्षा लहाडे यांचे संघटनेच्या सभासदत्व रद्द करून त्यांच्याविरोधात निलंबनाच्या कारवाईची तयारी करण्यात आली आहे.

आयएमए राज्य शाखेकडे डॉ. लहाडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - आयएमए नाशिकच्या सहसचिव म्हणून निवडल्या गेलेल्या वादग्रस्त स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ वर्षा लहाडे यांचे संघटनेच्या सभासदत्व रद्द करून त्यांच्याविरोधात निलंबनाच्या कारवाईची तयारी करण्यात आली आहे.
याबाबत राज्यध्याक्ष डॉ अशोक तांबे यांच्या स्वाक्षरीने नोटीस बाजावण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. याबाबत लहाडे यांनी तातडीने खुलासा द्यावा, असे न केल्यास त्यांच्या निलंबनाची कारवाईसाठी नाशिक कार्यकारिणी कडून एकत्र येत चर्चा करून निलांबनासाठीची सर्व कागदपत्रे व वर्तमानपत्रांच्या बातम्यांचे कात्रणं, आरोग्य उपसंचालकांचे पत्राची प्रत जोडून राज्य आयएमएकडे पाठविणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ। मंगेश थेटे यांनी नाशिक "लोकमत"ला दिली आहे.
लहाडे यांनी पदग्रहण न केल्याने त्या नूतन कार्यकारिणीमध्ये समाविष्ट नसलय्याचे थेटे यांनी स्पष्ट केले आहे .
लहाडे यांच्यावर प्रसवपूर्व गर्भलिंग निदान, वैद्यकीय गर्भपात कारवाईचा भंग, कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. अवैध गर्भपातप्रकरणी पोलिसांकडून चौकशी केली जाणार असून महापालिका फौजदारी गुन्हा दाखल करू शकते.