शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

अध्यक्ष नसलो तरी महंत आहे ना?

By admin | Updated: August 25, 2015 23:57 IST

मौन सोडले : ग्यानदास महाराजांचा नरमाईचा पवित्रा

नाशिक : भले मी आखाडा परिषदेचा अध्यक्ष नसलो, तरी निर्वाणी अनी आखाड्याचा महंत तर आहे ना, असा सवाल करीत श्री महंत ग्यानदास यांनी आज अखेर एक पाउल मागे घेतले. कुंभमेळ्यातील शाहीस्नान हे अध्यक्षाचे नव्हे, महंतांचेच असते. अध्यक्ष तर केवळ कामे करवून घेण्यासाठी असतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडल्याने त्यांचा नरमाईचा पवित्रा अधोरेखित झाला. गेल्या काही महिन्यांपासून श्री महंत ग्यानदास यांच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव आखाड्यांनी त्यांना अध्यक्ष मानण्यास यापूर्वीच नकार दिला आहे, तर रविवारी वैष्णव पंथातील सर्वांत मोठ्या दिगंबर अनी आखाड्यानेही ग्यानदास यांचा पाठिंबा काढून घेतला. महंत ग्यानदास हे हुकूमशहाप्रमाणे वागत असून, साधू-संतांना अपमानित करीत आहेत. त्यांच्याकडून पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याने त्यांचे अध्यक्षपद अमान्य करीत असल्याची घोषणा दिगंबर आखाड्याने केली. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून साधुग्राममध्ये तणावाचे वातावरण होते. दिगंबर आखाड्याकडून टीकास्र सोडले जात असताना, महंत ग्यानदास यांनी मात्र याबाबत मौन बाळगले होते. आज दुपारपर्यंत त्यांच्याशी कोणाचा संपर्क होऊ शकला नव्हता. ते त्रिवेणीधाम डाकोरधाम खालशाच्या ध्वजारोहणासाठी आले; मात्र काही मिनिटेच थांबत त्यांनी निर्वाणी आखाड्यात प्रयाण केले. अखेर सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करीत त्यांनी काही बाबी स्पष्ट केल्या. शाहीस्नान ठरल्याप्रमाणेच होणार असून, त्यासाठी आखाड्यांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे; मात्र तो पोलिसांच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल. सध्या चर्चेत असलेला वाद अनेक दिवसांपासून सुरू असून, त्यात नवे काहीच नाही. भावा-भावात भांडणे होतात; पण नंतर ते एकत्र येतातच. पाण्यात काठी मारल्यावर पाण्याचे दोन भाग होतात; पण ते लगेच एकत्रही येते. आम्हा साधूंचे तसेच आहे. आम्ही घरदार सोडून देव, देशकार्यासाठी आलो आहोत, एकमेकांशी भांडण्यासाठी नव्हे. समजा, मी अध्यक्ष नसलो, तरी अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय निर्वाणी अनी आखाड्याचा श्री महंत तर आहेच. शाहीस्नानात खरे महत्त्व हे अध्य्यक्षपदाला नव्हे, तर श्री महंतपदाला असते. अध्यक्ष फक्त कामे करवून घेण्यासाठी असतो. आमच्यातील वाद शाहीस्नानापर्यंत मिटेल. ईश्वरच तशी सद्बुद्धी देईल. माध्यमांनी कितीही प्रयत्न केले, तरी परिस्थिती बिघडणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)