बेकायदा हत्यार; ११ तरुणांवर गुन्हा
By Admin | Updated: December 4, 2015 00:18 IST2015-12-04T00:18:28+5:302015-12-04T00:18:53+5:30
बेकायदा हत्यार; ११ तरुणांवर गुन्हा

बेकायदा हत्यार; ११ तरुणांवर गुन्हा
येवला : तालुक्यातील अंदरसूल येथे विनापरवाना बेकायदा तलवार व गुप्तीसारखी हत्यारे बाळगल्याने ११ युवकांवर येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
येवला तालुका पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार गुरुवारी दिवसभर तालुका पोलिसांनी याबाबत कारवाई करत ११ युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना हत्यारासह ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक शांताराम घुगे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नील ऊर्फ पोंग्या शामराव (२५), दुर्गेश सोनार (२३), भरत पैठणकर (२७), जनार्दन गायकवाड (२४), कैलास वाकचौरे (२४), विशाल पुंड (२१), अमोल वाघचौरे (२४), रवींद्र पुंड (२४), रोहित पुंड (२२), शंकर माळी (२६) व दत्ता थोरात यांचेवर विनापरवाना हत्यार बाळगल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून थोरात वगळता दहा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवीदास पाटील, यलाप्पा खैरे, शांताराम घुगे, तुळशीराम जाधव, अमित सानप, कचरू उगलमुगले आदि पुढील तपास करत आहे. (वार्ताहर)