शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

भरारी पथकाने शहराच्या सीमेवर रोखली अवैध मद्यवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:04 IST

नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर रोखली.

ठळक मुद्दे१० लाख ५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त तब्बल ३७९ मद्याच्या बाटल्यांचा साठा हस्तगत केलातात्पुरत्या स्वरूपात स्थिर सीमावर्ती नाके कार्यान्वित

नाशिक : दादरा नगरहवेली, दीव-दमण यांसारख्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्यसाठा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. सिल्वासा येथून अशाच प्रकारच्या विविध ब्रॅन्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर रोखली. चोरट्या पद्धतीने महिंद्र जीपमध्ये दडवून वाहून नेणारा मद्यसाठा जप्त केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला असून, शहरासह जिल्ह्याच्या वेशीवर तात्पुरत्या स्वरूपात स्थिर सीमावर्ती नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच गस्ती पथकदेखील सक्रिय असून, भरारी पथक क्रमांक-१चे निरीक्षक मधुकर राख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी गिरणारे-हरसूल मार्गावर वाघेरा फाटा येथे सापळा रचला. एका चारचाकी जीपमधून चोरट्या पद्धतीने मद्यवाहतूक केली जाणार असल्याची खात्रिशीर माहिती त्यांच्याकडे होती. त्यानुसार दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, श्याम पानसरे, धनराज पवार, विलास कुवर आदींनी सापळा रचला. गिरणारे शिवारातून महिंद्र बोलेरो जीप (जी.जे. १४, एक्स ६३९३) यावर पथकाला संशय आला. पथकाने जीप रोखून जीपची बारकाईने पाहणी करताना कर्मचाऱ्यांना चेसीच्या खाली (बॉडीमध्ये) मागील बाजूने चोरटी जागा खास तयार करून घेतली गेली आहे. त्यामुळे पथकाचा संशय बळावला. गुजरात राज्यातील गीरसोमनाथ जिल्ह्याचा रहिवासी असलेला जीपचालक फरीदभाई रखाभाई उनडजाम (३७) यास ताब्यात घेतले असता त्याने त्या चोरट्या जागेत मद्याच्या बाटल्या असल्याची क बुली दिली. पथकाने तत्काळ जीपसह चालकास नाशिक येथील कार्यालयात आणून जीपची झडती घेत ती चोरटी जागा उघडली असता त्यामधून विविध ब्रॅन्डच्या तब्बल ३७९ मद्याच्या बाटल्यांचा साठा हस्तगत केला. मद्यसाठा व वाहन असा एकूण १० लाख ५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राख करीत आहेत.मासे वाहतुकीचा बनाव फसलाथर्माकोलच्या खोक्यांना माशांचा वास लागलेला असल्यामुळे तपासणी नाक्यांवर कर्मचाऱ्यांना संशय येणार नाही व चोरट्या जागेत दडवून ठेवलेले मद्य सहजरीत्या वाहून नेणे शक्य होईल म्हणून चालक व मालकाने शक्कल लढविली, परंतु क र्मचा-यांच्या सतर्कतेमुळे बनाव फसला. प्रथमदर्शनी जीपमध्ये केवळ थर्माकोलची रिकामी खोकी अस्ताव्यस्त पद्धतीने भरलेली दिसून आली अन् तेथेच चोरट्या मद्य वाहतुकीचा संशय अधिकच बळावला.

टॅग्स :NashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभागMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019