शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:13 IST

निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जप्त केला. यावेळी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून फरार झाले

निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जप्त केला. यावेळी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून फरार झालेयाबाबत नांदूरमधमेश्वर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांनी माहिती दिली. शनिवारी (दि.९) वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अभयारण्य परिसरात गस्त घालत असताना गोदावरी पात्रात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन सुरू असल्याचे पथकाच्या लक्षात येताच वाळू उत्खनन करणाऱ्यांनी निळ्या रंगाची वाळूची ट्रॉली व ट्रॅक्टर सोडून तेथून पोबारा केला. सदर दोन्ही वाहने, वाळू उत्खननाची साधने, साहित्य वनविभागाने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही वाहनांवर नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहनांना पकडले जाऊन कारवाई होण्याच्या भीतीने नंबरप्लेट लावत नसल्याचे समोर आले आहे. या कारवाईत वनरक्षक अश्विनी पाटील, संरक्षण मजूर आघाव, जाधव, गांगुर्डे सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी