शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर व्रिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:31 IST

येथील टिळकपथ परिसरातील एका औषध विक्रीच्या दुकानात संशयित प्रसाद शुक्ला यांनी त्यांचे इतर साथीदार संशयित जयेश रवींद्र नेरकर हा फार्मसिस्ट म्हणून नोकरीसाठी ठेवले. नेरकर याने संशयित विक्रांत देवरेकडून स्त्रियांच्या गर्भपाताची गोळ्या घेत त्याची बेकायदेशीरपणे विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हा : अन्न औषध प्रशासनाकडून तक्रार

नाशिक : येथील टिळकपथ परिसरातील एका औषध विक्रीच्या दुकानात संशयित प्रसाद शुक्ला यांनी त्यांचे इतर साथीदार संशयित जयेश रवींद्र नेरकर हा फार्मसिस्ट म्हणून नोकरीसाठी ठेवले. नेरकर याने संशयित विक्रांत देवरेकडून स्त्रियांच्या गर्भपाताची गोळ्या घेत त्याची बेकायदेशीरपणे विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अन्न औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांना सदर औषधविक्रीच्या दुकानात फार्मसिस्ट म्हणून संशयित नेरकर हा गर्भपाताची औषधे सर्रासपणे बेकायदेशीररीत्या अवैध मार्गाने विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी देशमुख यांनी संशयित नेरकरसह शुक्ला, देवरेविरुद्ध औषध, सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० तसेच एमपीटी कायदा २००२अन्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात देशमुख यांनी फिर्याद दिली. नेरकर याने देवरेकडून स्त्रियांची गर्भपात करणारी औषधे एमटी-कीट, गेस्टप्री नावाच्या गोळ्याऔषधे अवैधरीत्या विक्री करताना आढळून आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी