अवैध दारूविक्री जोरात सुरू

By Admin | Updated: April 13, 2015 01:37 IST2015-04-13T01:37:08+5:302015-04-13T01:37:31+5:30

अवैध दारूविक्री जोरात सुरू

Illegal liquor intensified | अवैध दारूविक्री जोरात सुरू

अवैध दारूविक्री जोरात सुरू

सातपूर : परिसरातील अवैध दारू धंदे व वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक हैराण झाले असून, मालमत्ता सुरक्षित राहिलेली नाही. हा जीवघेणा प्रकार त्वरित बंद करावा, अशी मागणी माकपाच्या अ‍ॅड. वसुधा कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
अ‍ॅड. वसुधा कराड, सीताराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास मेढे यांची भेट घेतली व चर्चा केली. प्रबुद्धनगर झोपडपट्टीत गरीब आणि कष्टकरी नागरिक राहतात. या ठिकाणी अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. दारू पिण्यामुळे वर्षभरात अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दारूमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच गुन्हेगारीही वाढली आहे. अवैध दारू धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांची मालमत्ता सुरक्षित राहिलेली नाही. अवैध दारूविक्री आणि अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्टमंडळात कल्पना शिंदे, सिंधू शार्दुल, विजया टिक्कल, वेणू पालवे, जया देहाडे, वंदना साळवे, आशा तालखे, सिंधू उसळे, लक्ष्मी अहिरे, वंदना डबाळे, हिराबाई मोंढे, अलका मोंढे, सुमन तुपलोंढे, शीला गायकवाड आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: Illegal liquor intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.