नागरीकांची तक्रार पंचवटी : हिरावाडी साईनगर परिसरात असलेल्या शिवसाईनगर येथे एका घरात कुंटणखाना चालविला जात असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. शिवसाईनगर वसाहतीतील (मळयात) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे परिसरातील महिलांना तसेच युवतींना रस्त्याने येजा करणे अवघड झाले असुन गेल्या उघडपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाला राजकीय पाठबळ असल्यानेच पोलीस कारवाई करत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. पुर्वी हॉटेल तसेच लॉज व आता थेट नागरी वसाहतीत कुंटणखाना चालविला जात असला तरी पोलीस प्रशासन गप्प का असा सवाल नागरीकांनी केला असुन अवैध व्यवसाय चालविणार्यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
शिवसाईनगरला अवैध व्यवसाय
By admin | Updated: May 8, 2014 21:23 IST