अवैधरीत्या मद्याची वाहतूक; दोघा जणांवर गुन्हा
By Admin | Updated: June 30, 2015 01:27 IST2015-06-30T01:27:23+5:302015-06-30T01:27:59+5:30
अवैधरीत्या मद्याची वाहतूक; दोघा जणांवर गुन्हा

अवैधरीत्या मद्याची वाहतूक; दोघा जणांवर गुन्हा
नाशिकरोड : सिन्नरकडून मारुती व्हॅनमध्ये अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघा जणांवर गुन्हा दाखल करून साडेसहा हजार रुपये किमतीचे मद्य जप्त केले आहे.सिन्नरकडून मारुती व्हॅन (एमएच ०१ पीए ४८१०)मधून दिनेश मनोहर तळेकर, कुणाल अनिल मोरे हे दोघे प्रिन्स संत्रा देशी दारूच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या व टॅँगो पंच- १८० मिलीच्या ४८ बाटल्या विनापरवाना घेऊन जात होते.
रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सिन्नरफाटा चौफुलीवर पोलिसांच्या गस्त पथकाने मारुती व्हॅन थांबवून तिची तपासणी केली असता गाडीमध्ये विनापरवाना मद्याची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)